कसाबची मुक्ताफळे...

Friday, 29 May 2009



उज्ज्वल निकम- क्यू कसाब तुम हसते क्यू रहते हो, नौंटकी क्यू करते हो ?
कसाब- मै कुछ नही करता हूं.

उज्ज्वल निकम- तुने इतने लोगों को मारा है और तुम हस रहे हो ?
कसाब- मैने...मैने किसी को नही मारा..तुम झूठ बोल रहे हो.

उज्ज्वल निकम- तो मै क्या झूठ बोल रहा हूं ?
कसाब- जाने दो ना सहाब मैरा फैसला कोर्ट करेगा.
कोणालाही मारलेले नाही. तुम्हीच खोटे बोलत आहात

ही फळं आहेत आपल्या उदारमतवादाची. कसाबविरूद्ध कायदेशीर मार्गाने खटला चालावा, त्याला कायदेशीर मार्गाने शिक्षा दिली जावी या विचारसरणीमुळे आज पाकिस्तानमधला एक अतिरेकी मुंबईत येऊन आपल्या वकीलांना उद्धटपणे उत्तर देतो. हे चित्र दुसरीकडे कुठेही पहायला मिळणार नाही. न्यायाधीश एम.एल.तहिलयानी हे कोर्टामध्ये येण्यापूर्वी निकम आणि कसाब यांच्यात हा संवाद झाला. ज्यातून कसाबच्या अंगात किती मस्ती आहे हे दिसून येतं. याआधी सुनावणीदरम्यान तुकाराम ओंबळेंचं नाव निघाल्यावर दात काढणा-या कसाबचे दात घशात घालणं गरजेचं आहे. विनाकारण हसणा-या कसाबला न्यायालयाने वेळोवेळी समज दिली आहे. दरम्यान, गिरगाव चौपाटीवरील चकमकीत ठार झालेल्या अबू इस्माईलकडून मिळालेला नकाशा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला. त्याआधी त्यातील ठिकाणांच्या नावाभोवती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत मर्दे यांनी लाल पेनने गोलाकार केले होते व तो नकाशा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविला होता. त्याबाबतच्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

Read more...

कसाब एक चिंधी चोर

Wednesday, 27 May 2009


मुंबईवर हल्ला करणारा कसाब जिहादी वैगरे नसून तो पैश्यांसाठी हावरा असलेला एक चिंधई चोर असल्याचं एका घटनेवरून स्पष्ट झालं. चकमकीत अबू इस्माईलला ठार केल्यानंतर त्याच्याकडून काही पैसे हस्तगत करण्यात आले होते. साक्षीदरम्यान तपास अधिकारी या पैशांची ओळख पटवत असताना कसाब पैश्यांकडे असा काही पहात होता, की त्याच्या तोंडातून केव्हाही लाळ गळेल असं वाटत होतं. ही बाब जज एम.एल तहिलयानी यांच्याही निदर्शनातून सुटली नाही. तहिलयानी लगेच उद्गारले की अरे " ते पैसे लपवा, जर कसाबने हे पैसे पाहिले तर तो रडायला लागेल आणि माझे पैसे मला परत द्या असा हट्ट करेल " तहिलयानी यांच्या या वाक्यानंतर कोर्टात असा एकही मनुष्य नव्हता जो हसला नाही. याआधीही कसाबने मला अटक करताना माझ्याकडे असलेले ५ हजार ४०० रूपए जप्त करण्यात आले होते, त्या पैश्यांचं काय झालं असा सवाल कसाबने विचारला होता. कोर्टामध्ये गिरगांव चौपाटी चकमकीप्रकरणी कसाबविरुद्ध पहिल्यांदा खुनाचा गुन्हा दाखल करून घेणारे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी विनोद सावंत यांची साक्ष नोंदविण्यात आली.

Read more...

२९ दिवस ३० साक्षीदार...

Tuesday, 26 May 2009


खटल्याला बुधवारी म्हणजेच २६ मे रोजी २९ दिवस पूर्ण झाले. या २९ दिवसांमध्ये न्यायालयामध्ये तब्बल ३० साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली. बुधवारी भरत तामोरे यांनी कोर्टामध्ये साक्ष नोंदवण्यात आली. तामोरे यांनी २६ नोव्हेंबरला कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्क इथे उतरताना पाहीलं तामोरे यांनी या दहा जणांना पाहून प्रश्न विचारला होता की तुम लोग कहॉं से आये हो यावर सर्वात पुढे असलेल्या कसाबने, हम स्टुडंट हैं असं उत्तर दिलं. कसाबचा साथीदार अबू ईस्माईलने उद्धटपणे तुमको क्या करना है असं तामोरेंना उत्तर दिलं. बधवार पार्क इथे उतरलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे आठ जणांच्या पाठीवर सॅक व हातात काळी हॅण्डबॅग होती. तामोरे न्यायालयात बसलेल्या कसाबला ओळखलं. तामोरे यांनी यापूर्वी अबू इस्माईलच्या मृतदेहाची ओळखही पटवली आहे. तामोरे ताज हॉटेलमध्ये काम करतात, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीही ते कामावर गेले होते. मात्र त्यांना कल्पना नव्हती की ज्यांना त्यांनी हटकलं होतं त्यांपैकीच काही जणांनी मुंबईत हल्ला केलाय. तामोरे यांच्याव्यतिरिक्त प्रशांत धनू या तरूणानेही साक्ष नोंदवली. साक्षीदरम्यान त्याने कोर्टात दाखवण्यात आलेली काळ्या पिवळ्या रंगाची रबरी डिंगी (छोटी बोट) ओळखली. याच डिंगीतून सर्व अतिरेकी मुंबईच्या किना-यावर आले होते.

Read more...

मला परत सदस्यत्व द्या हो...

Thursday, 21 May 2009




कसाबचे वकील अब्बास काझमी यांचं सदस्यत्व इस्लामिक जिमखान्याने रद्द केलं. याला काझमी यांनी विशेष कोर्टामध्ये आव्हान दिलंय. काझमी यांनी आपल्या अर्जात जिमखान्याने कोर्टाचा अवमान केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे केली. कसाबचे वकील म्हणून विशेष न्यायालयाने त्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आपल्यावर सोपविलेले काम आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. परंतु विश्वस्त मंडळावरील सदस्यत्व रद्द करून आणि विविध आरोप करून जिमखान्यातर्फे आपल्याला या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केरत आहे असा आरोप काझमी यांनी केलाय. त्यामुळे जिमखान्याच्या अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी करावी, अशी मागणी अ‍ॅड. काझ्मी यांनी केली आहे. दरम्यान, कसाब व अन्य आरोपींविरुद्ध भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा मुख्य आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र या त्यात जम्मू आणि काश्मीर मिळविण्यासाठी हल्ला केला गेल्याचे नमूद नाही. त्यामुळे ते त्या आरोपांच्या कारणांमध्ये नमूद करावे, अशी मागणी आज अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी एका अर्जाद्वारे केली. आरोपांमध्ये अभियोग पक्षाने प्रस्तावित केलेले सर्व तपशील येणे गरजेचे नाही. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरसाठी हल्ला केल्याचे आरोपात नमूद नसले तरी फारसा पडक पडणार नसल्याचे न्या. टहलियानी यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकम यांच्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज दाखल करून घेतला

Read more...

कसाब बोगस आहे...

Tuesday, 19 May 2009


विशेष कोर्टामध्ये हैद्राबादच्या अरूणोदय पदवी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल जी.राधाकृष्णन यांना बोलावण्यात आलं. कसाब आणि त्याच्या इतर सहा साथीदारांकडे सापडलेली अरूणोदय कॉलेजची आय.डी बोगस असल्याचं राधाकृष्णन यांनी कोर्टाला सांगितलं. राधाकृष्णन यांच्यासह कोर्टात पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात नायर रुग्णालयातील मुख्य आणि सहाय्यक नोंदणी अधिकारी तसंच अबू इस्माईलकडून सापडलेला बॉम्ब चौपाटी येथे निकामी करतेवेळी उपस्थित असलेल्या पंचाचा समावेश होता. याशिवाय अबू इस्माईलच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि पोलीस उपनिरीक्षक भास्कर कदम यांची सर्व्हीस रिव्हॉल्व्हर जप्त करणा-या पंचाचीही या साक्ष नोंदविण्यात आली. राधाकृष्णन यांनी साक्षीदरम्यान अरुणोदय पदवी कॉलेजमध्ये केवळ आंध्र प्रदेशमधील विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात असं सांगितलं. तसंच आय.डी.वर प्राचार्य म्हणून माझी विद्यार्थ्यांची सही गरजेची असते आणि आय.डी कॉम्प्युटरच्या मदतीने बनवलं जात. अतिरेक्यांकडे सापडलेली आय.डी ही हाताने बनवली असल्याचं राधाकृष्णन यांनी कोर्टाला सांगितलं.

Read more...

फहिमच होता अतिरेक्यांचा "मार्ग"दर्शक

Monday, 18 May 2009




आत्तापर्यंत खटल्यामध्ये फक्त कसाब एके कसाब असंच चालू होतं. इतर दोन आरोपींबाबत काहीच ऐकू येत नव्हतं. मात्र १८ एप्रिलला एका पंचाने फहिमने हल्ल्यामध्ये कशी भुमिका बजावली हे कोर्टाला सांगितलं. पाकिस्तानी दहशतवाद्यांना टार्गेट पर्यंत पोचता यावं यासाठी फहिम ने नकाशे तयार केले होते. गिरगांव चौपाटीवर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अबू इस्माईलकडून सीएसटी, चौपाटी, मलबार हिल या ठिकाणांपर्यंत पोहोचण्याची दिशा दाखविणारे नकाशे सापडले होते. त्यामुळे फहिमची कटामध्ये महत्वपूर्ण भुमिका असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी कोर्टाला सांगितलं. अबू इसमाईलच्या मृतदेहाचा आणि कसाबच्या कपड्यांचा पंचनामा करणारे शिवाजी शिवलेकर यांनी या नकाश्यांबाबात कोर्टावला मिहीती दिली. अबू इस्माईलच्या खिश्यातून चुरगळलेला कागद सापडला होता ज्यावर काही ठिकाणांची नावं लिहली होती तो कागद शिवलेकर यांनी कोर्टात ओळखला. कसाबच्या कपडय़ांच्या पंचनाम्यादरम्यान बंगळुरू येथील महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडलं होतं. समीर चौधरी नावानं असलेल्या या आय.डी.वर कसाबचा फोटो होता. शिवलेकर यांनी कोर्टामध्ये असलेल्या कसाबची ओळख पटवली. शिवलेकर यांच्याशिवाय शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या मृतदेहाचा आणि त्यांच्या कपडय़ांचा पंचनामा करणा-या राजा वसईकर यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. २६ / ११ च्या रात्री शिवलेकर यांनी आपल्या मित्राला अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी नायर हॉस्पीटलमध्ये गेल्याचं कोर्टाला सांगितलं. यावर फहिमचे वकील शाहीद आझमी यांनी शिवलेकर खोटं बोलत असल्याचा. ज्या मित्रासोबत शिवलेकर हॉस्पीटलमध्ये गेले त्याला न कळविताच ते रुग्णालयातून परस्पर घरी का गेले असा सवाल आझमी यांनी केला. शिवलेकर त्या रात्री रुग्णालयात गेलेच नव्हते, तर मित्राला पाहायला गेले होतो, असे ते खोटे सांगत आहेत, असा आरोपही आझमी यांनी केला. पोलिसांनी तयार केलेल्या पंचनाम्यावर शिवलेकर यांनी नंतर सही केल्याचं आझमी यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व आरोप शिवलेकर यांनी फेटाळून लावलेत

Read more...

काझमींना झाला कसाबचा खटला डोईजड...

Sunday, 17 May 2009




अब्बास काझमी....अतिरेकी अजमल आमीर कसाबचे वकील... मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी निगडीत खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कोर्टाच्या कार्यपद्धतीबद्दल काझमी नाराज आहेत. खटल्यातील एक पंच शशिकांत पवार यांच्या वयाबाबत काझमी युक्तीवाद करत असताना न्यायाधीश एम.एल. तहिलयानी आणि काझमी यांच्यात खटका उडाला. यावर आपल्याला कसाबची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जात नसल्याची तक्रार काझमी यांनी न्यायाधीशांकडे केली. यावर तहिलयानी यांनी काझमी यांना जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर तुम्ही खटला सोडू शकता असं सांगितलं. यावर भडकलेल्या काझमी यांनीही मी खटला सोडतो असं सांगितलं. काझमी यांनी खटल्यातून अंग काढून घेतलं तर न्यायालयीन कामकाजाचा आणकी वेळ वाया जाईल हे लक्षात आल्यानंतर न्यायाधीश एम.एल .तहिलयानी यांनी समजुतीने प्रकरण शांत केलं. यानंतर सरकारी वकीलांनी आणखी तीन साक्षीदार कोर्टासमोर हजर केले. या तिघांनीही कसाबला ओळखलं. या तिघांच्या साक्षीदारांच्या साक्षीनंतर पोलीस निरीक्षक भास्कर सावंत यांनी पुन्हा साक्षीसाठी कोर्टात बोलावण्यात आलं. गिरगांव चौपाटीवर झालेल्या चकमकीनंतर मिळालेल्या आयकार्डवरील फोटो हा अभू ईस्माईलचा होता असं सांगितलं. अबू ईस्माईल कसाबचा साथीदार होता ज्याला मुंबई पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं.

Read more...

About This Blog

Lorem Ipsum

  © Free Blogger Templates Nightingale by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP