आणि खटला सुरू झाला....
Wednesday, 15 April 2009
26/11 चा हल्ला ज्यांनी पाहिला नाही नुसता ऐकला त्यांना खटला कव्हर करताना तीव्रता कळणार नाही(मात्र असे रिपोर्टर बोटावर मोजता येण्याएतकेच असतील) १५ एप्रिल २००९ ला खटल्याची सुरवात झाली. मी १९९३ चा बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल कव्हर केलाय, तेव्हाचं आणि आत्ताचं कोर्ट यात जमीन अस्मानाचा फरक झालाय. खटला आर्थर रोड तुरुंगात सुरू करण्यात आलाय आणि तुरुंगाभोवती मुंबई पोलिसांबरोबरच इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान सुरेक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. खटला कव्हर करणा-या रिपोर्टर्ससाठी विशेष पास बनवण्यात आले, आणि ९३ ब्लास्ट खटल्याच्या पेक्षा दुप्पट चेकींग हा खटला कव्हर करणा-या रिपोर्ट्सचं होतंय. १९९३ ब्लास्ट चा खटला सुरू झाला तेव्हा आपल्यापैकी अनेकजण पत्रकारितेतही नव्हते. मात्र यावेळी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा खटला आपल्याला जवळून पाहता येणार आहे. हा ब्लॉग सुरू करण्यामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे तुम्हा आम्हाला मदत व्हावी (जुने रेफरन्स मिळवण्यासाठी) आणि फक्त फिल्डवर आणि आपल्यातच राहणा-या काही बातम्या सगळ्यांबरोबर शेअर करता याव्यात यासाठी
2 comments:
तुझ्या या स्त्युत्य उपक्रमामुळे काही उपद्रवांना (िवशेषकरून प्राजक्ता) प्रेरणा िमळालेली आहे. आिण ते उपद्रवी तुझ्या या उप्रकमाची अगदी आतापासून कॉपी करण्यास सज्ज झालेले आहेत. त्यामुळे लवकरच तुझ्या प्रेरणेतून उद्युक्त झालेले ब्लॉग आता तुला पाहायला िमळणार आहे. आिण माझं िवचारशील तर तू खूप चांगल काम करतोयस कारण पुढेमागे रेफरन्सची गरज लागली तर हा ब्लॉग खूप उपयुक्त ठरणार आहे (फक्त अचूक आिण न चुकता िलिहलसं तर) सो िकप इट अप.... आिण असाच सगळ्यांसाठी (प्राजक्तासाठी)प्रेरणास्त्रोत बनत रहा.
Dear Shrirang,
I Highly appreciate you about your Blog.
It is very crucial thing to maintain upto date and time to time keep us informing about 26/11 Case Hearing in court and we know what are the discussion goning on court.
I hope this blog will be read by each and every Mumbaikar.
Post a Comment