वाचाळ उद्योग...
Wednesday, 22 April 2009
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री ए.आर.अंतुले यांना कोर्टाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सबाउद्दीन याच्या वकीलांनी या दोघांना फिर्यादीचे साक्षीदार म्हणून कोर्टात हजर केलं जावं अशी मागणी केलीय. दरम्यान विशेष कोर्टाने कसाबला उर्दूमध्ये चार्जशीट मिळणार नाही असं सांगितलंय. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या विधांनामुळे चर्चेत आलेल्या नारायण राणे आणि ए.आर.अंतुले यांना कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून उभं रहावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सबाउद्दीन याचे वकील इजाज नक्वी यांनी कोर्टामध्ये या दोघांना फिर्यादीचे साक्षीदार म्हणून हजर करण्यात यावं अशी मागणी केलीय. उद्योग मंत्री राणे यांनी अतिरेक्यांना राज्यातल्याच कोणत्यातरी व्यक्ती मदत केली असल्याचा आरोप केला होता. तर केंद्रीय मंत्री अंतुले यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, आणि अशोक कामटे यांची हत्या झाली नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप केला होता. दरम्यान कोर्टाने कसाबच्या वकीलांनी उर्दूमध्ये आरोपपत्र मिळावं यासाठी केलेला अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे कसाबला उर्दूमध्ये चार्जशीट मिळणार नाही. इजाझ नक्वी यांनी कोर्टापुढे सबाउद्दीन याची छळवणूक करणा-या एफ.बी.आय अधिका-यांविरुद्ध कारवाई करावी असा अर्ज केला होता. हा अर्ज नक्वी यांनी मागे घेतलाय. सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टाला कसाब अल्पवयीन आहे की नाही याची चौकशी करून एकदाच काय तो निर्णय घ्यावा म्हणून मागणी केली होती. याबाबतचा निर्णय कोर्टाने २४ तारखेला घेणार आहे.
0 comments:
Post a Comment